Pune News : बनावट फर्मद्वारे ४९६ कोटींचा कर बुडवला
Updated On:

पुणे : खोटे आधार, पॅनकार्ड व सीमकार्डचा वापर करून बनावट कंपन्या व बँक खाती तयार करत दोघांनी तब्बल ४९६ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) चुकविल्याचा प्रकार आला आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने ही करचुकवेगिरी उघड केली आहे.
याबाबत पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी दिनेश कुमार जैन (वय २६, रा. देवडा, राजस्थान) आणि विरेंद्र कुमार (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला.




