पुणे : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव ओव्हर फ्लो

पुणे : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. सिंहगड रोड संकुलातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कात्रजचा नाना साहेब पेशवे तलाव पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे.
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कात्रज येथील ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. नानासाहेब पेशवे तलाव ओवर फ्लो झाला आहे. मोऱ्यामधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले.
पहाटे तलावाच्या मोऱ्यामधून उघडण्यात आल्या आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. कात्रज घाट व डोंगर परिसर व माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून ओढ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी कात्रज तलावात येत आहे.





