पुणे | पत्नीचा गळ्यावर चाकूने वार करून खून
Updated On:

पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पतीने लाॅज ला कुलूप लावून पळून गेला. हि घटना शनिवारी (दि.१५) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. काजल कृष्णा कदम वय २७ वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती पत्नी होते, ते दोघेही मंजूरी चे काम करत होते, शनिवारी दुपारी ते भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजवर उतरले होते





