पुणे – आम आदमी पक्षाने सर्वात प्रथम उमेदवार यादी जाहीर केली. यावेळी ९३ ते ९५ उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवारीवरून गोंधळ सुरू असताना आम आदमी पक्ष मात्र याला अपवाद राहिला. आपने वेळीच उमेदवार यादी जाहीर करत आघाडी घेतली. आपने त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे पसंत केले. येत्या काही दिवसांत बंडखोर नेत्यांकडून अर्ज माघारी घेतले जाण्याची शक्यता आहे. मतदारांच्या मनातही प्रस्थापित पक्ष आणि दलबदलू नेत्यांबाबत राग आहे. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसेल व सामान्य माणसाच्या विकासाला अग्रक्रम देणाऱ्या आमच्या उमेदवारांना निवडून देतील, असा विश्वास आपचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला आहे.