Pune News : आजपासून पुणे मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावणार; गणेशभक्तांसाठी वेळापत्रकात आणि फेऱ्यांमध्ये मोठा बदल
Pune News : गणेशोत्सवानिमित्त मध्यवर्ती पेठांमध्ये गणपती दर्शनासाठी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Pune News : गणेशोत्सवातील भाविकांची गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रोची सेवा गुरुवारपासून (दि. १७) रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी आणि रात्री उशिरा उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचे मर्यादित पर्याय लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. (Pune News)
गणेशोत्सवासाठी मेट्रोने गर्दीच्या वेळेतील फेऱ्यांची वारंवारिताही वाढविली आहे. त्यानुसार सध्या सहा मिनिटांच्या अंतराने धावणारी मेट्रो गर्दीच्या काळात पाच मिनिटांच्या अंतराने उपलब्ध होणार आहे. रात्री दोन वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार असल्याने मध्यवर्ती भागातील गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना परतीचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे. (Pune News)

Pune News : आजपासून पुणे मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावणार; गणेशभक्तांसाठी वेळापत्रकात आणि फेऱ्यांमध्ये मोठा बदल
मेट्रो स्थानकांवर संभाव्य गर्दी नियंत्रणासाठीही प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावरून येणाऱ्या गणेशभक्तांनी कसबा पेठ स्थानकात उतरून पुढील प्रवास करावा, तर वनाज ते रामवाडी मार्गावरून येणाऱ्या भाविकांनी पीएमसी स्थानकात उतरून गणपतींच्या दर्शनासाठी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडई स्थानकावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने या स्थानकावरील गर्दी टाळावी, असेही मेट्रो प्रशासनाने सांगितले. (Pune News)





