Ozar News :श्री क्षेत्र ओझर येथे लाल मातीतील भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामा संपन्न
Ozar News : अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामविकास संस्था यांच्या वतीने आयोजित 'लाल मातीतील भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामा' हजारो कुस्तीप्रेमींच्या उत्साही उपस्थितीत पार पडला.

Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या व ग्रामविकास संस्था श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने लाल मातीतील भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामा मोठ्या उत्साहात व हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नामवंत मल्लांनी आपल्या कुस्तीच्या डावपेचांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. (Ozar News)
या कुस्ती हंगामाचे लिलावदार तुकाराम खडूं घेगडे व रामदास खडूं घेगडे यांनी १ लाख २५ हजार रुपये रक्कम देऊन हंगामाचा लिलाव घेतला. तसेच पोगोट्याचे लिलावदार रघुनाथशेठ गजानन कवडे यांनी ५५ हजार रुपये, तर पानसुपारीचे लिलावदार रघुनाथशेठ गजानन कवडे यांनी ५५ हजार रुपये रक्कम देत सहभाग नोंदविला. या सर्व लिलावदारांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. (Ozar News)
हंगामातील लक्षवेधी ठरलेली अंतिम कुस्ती ११ हजार रुपये रकमेची झाली. ही कुस्ती पै. फुलमाळी यांनी निकाली काढली. लिलावदार, प्रमुख मान्यवर व श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात आला. (Ozar News)
या कुस्ती हंगामासाठी किशोर कवडे, लक्ष्मण टेभेकर, शहाजी रवळे, मंगेश मांडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, विश्वस्त संतोष कवडे, गणपत कवडे, माजी उपाध्यक्ष अजित कवडे व विश्वस्त विनायक मांडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. (Ozar News)
यावेळी मानाची ढाल पिंटू पैलवान धोलवड यांना प्राप्त झाली. ही मानाची ढाल कै. अप्पासाहेब जोगळेकर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र जोगळेकर यांनी नेहमीप्रमाणे अंतिम कुस्तीसाठी ठेवली होती. (Ozar News)
कुस्ती हंगामाचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सूर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, संतोष कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव व सौ. शिल्पाताई जगदाळे यांनी केले. (Ozar News)
अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी दंगलगाणी’ कार्यक्रमाला रसिकांची गर्दी
दरम्यान, रात्री ठीक १० वाजता अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शौकिन रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. मंगलगाणी व दंगलगाणीच्या सुरांनी परिसरात सांस्कृतिक रंग भरला असून, रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. (Ozar News)
लाल मातीतील थरारक कुस्त्या तसेच त्यानंतर रंगलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमामुळे श्री क्षेत्र ओझर येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी माजी आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कार्तिक लांडगे, कपिद्रिकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे, पंचायत समिती सदस्या छायाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कुस्तीप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेतला. (Ozar News)
Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न
Ozar News : श्रीक्षेत्र ओझर येथे पहिल्याच दिवशी दोन द्वार यात्रा उत्साहात; हजारो भाविकांचा सहभाग





