Pune News : बीजे मेडिकल वसतिगृहाच्या आवारात पाण्याची टाकी पाडताना एक जखमी; अग्निशमन दलाकडून जीवदान
Pune News : पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अत्यंत धोकादायक स्थितीत असलेली सुमारे ५० फूट उंच पाण्याची टाकी पाडताना अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

Pune News : बीजे वैद्यकीय महाविद्यालय वसतीगृह येथील अत्यंत धोकादायक स्थितीत असलेली सुमारे ५० फुट उंच टाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाडण्याचे काम सुरू होते. अचानक टाकी कोसळून एक कामगार गंभीर जखमी अवस्थेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. १६ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे कामगारास वाचविण्यात यश आले. (Pune News)
अग्निशमन दलाच्या जवानांकडून तात्काळ जखमीशी संवाद साधत बोल्ड कटर, स्प्रेडर, टिकाव, फावडे, रश्शी असे साहित्य वापरत सुमारे तासाभरात सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून तात्काळ झालेल्या कार्यवाहीमुळे सदर कामगाराचा जीव वाचला असून त्याला जीवदान मिळाले. (Pune News)
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी निलेश महाजन तसेच जवान राजु ओव्हाळ, अमित कसबे, भाऊसाहेब चोरमले, विजय पिंजण, जयेश गाताडे, अल्पेश कोंडे, नवनाथ जेडगे, मारुती देवकुळे, विशाल गायकवाड,आतिश ओव्हाळ, प्रताप सांगळे, सुरेश पवार, प्रतिक कुंभार, विजू वाघमारे, मयूर चव्हाण, दत्ता खांडरे यांनी सहभाग घेतला. (Pune News)
Pune News : विसर्जनामागे दडला निसर्ग आणि संस्कारांचा संदेश
Pune News : फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग





