पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण

पुणे – पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वत: त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. महापौरांची प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 27, 2022
मुरलीधर मोहोळ ट्वीट मध्ये म्हणाले की, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.





