Pune: येरवडयात लाकडाच्या गोदामला भीषण आग
Updated On:

पुणे : येरवडा-औद्योगिक शाळेसमोरील लाकडाच्या गोदामाला सकाळी सहा वाजेदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मोठया प्रमाणात प्लायवूड असल्याने ही आग पसरली. या घटनेनंतर अग्निशमक दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली ते कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
#येरवडा, #पुणे : लाकडाच्या गोदामला भीषण आग
अग्निशमक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न pic.twitter.com/j2KlfKmLjf— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) March 16, 2024





