पुणे : मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला
Updated On:

पुणे – जमीन विकत घेण्यासाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचे कर्ज शिवाजीराव भोसले बॅंकेकडून घेतले. त्या बदल्यात जमीन गहाण असतानाही तिची परस्पर विक्री केली. या प्रकरणात जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी फेटाळला.
“बांदल यांनी या प्रकरणात स्वत:चे नाव येऊ नये, यासाठी दोघांना हाताशी धरून अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्ज घेऊन पैसे वापरले. हप्ते न भरता जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळावा,’ असा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर नंदा, हरचरणपाल नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.





