Pune: आजारी वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षे सक्तमजुरी
Pune: ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली. पीडित व आरोपी नात्यातील आहे. पीडित आजारी होती. त्यावेळी दवाखान्यात घेऊन गेला. परत येत असताना....

Pune: आजारी असलेल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला दवाखान्यात नेवून परत आणताना तोंडात रुमाल घालून बलात्कार करणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीला १० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एच.के. भालेराव यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली.
चंद्रकांत भिकू निबुरे (वय ५८, रा. मुळशी तालुका) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडितेने पौड पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संजय पवार यांनी ८ साक्षीदार तपासले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायाधीश पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, हवालदार अल्ताफ इनामदार, अकबर शेख यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.
ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली. पीडित व आरोपी नात्यातील आहे. पीडित आजारी होती. त्यावेळी दवाखान्यात घेऊन गेला. परत येत असताना फिर्यादीच्या मुलाच्या अर्धवट बंधकामावर घेऊन गेला. तेथे फिर्यादीला जमिनीवर पाडून, धमकावून, फिर्यादी ओरडू नये, यासाठी तोंडात रुमाल घालून बलात्कार केला.
याबाबत कोणाला सांगू नको, असे म्हणून निघून गेला. फिर्यादी पायी घरी गेली. मुलाला घेऊन जाऊन पौड पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे दाव्यात वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील संजय पवार यांनी केली.
MPC meeting: बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBIचा मोठा निर्णय; फसवणूक आणि ‘मिस-सेलिंग’ला बसणार लगाम





