Pune: पालेभाज्यांची आवक घटली; कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापातच्या भावात वाढ
Updated On:

पुणे – पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत. घाऊक बाजारात सर्वाधिक कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ७ रुपयांनी वाढ झाली आहे. मेथी, शेपू, कांदापात, मुळे आणि पालकच्या भावातही जुडीमागे प्रत्येकी ५ रुपयांनी वाढ झाली आहे. चुकाच्या भावात २ रुपये, तर करडई, चवळई आणि अंबाडीच्या भावात प्रत्येकी एक रुपयाने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीची ४० रुपयांनी, तर कोथिंबिरीची ३० रुपयांनी विक्री होत आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. २४) कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी, तर मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.





