Pune Crime : पुण्यातील नामांकित लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग; डेक्कन पोलिसांकडून ५ जणांवर गुन्हा
Pune Crime : पुण्यात विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime : शहरातील एका नामांकित विधी महाविद्यालयातील वसतिगृहात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
या बाबत एका विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३५ वर्षीय विद्यार्थी एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आवार, तसेच वसतिगृहात त्रास दिल्याचा तक्रार अर्ज विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात नुकताच दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)
विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी संबंधित महाविद्यालयाच्या वसतिगृहास भेट देऊन चैाकशी केली. (Pune Crime)
प्राथमिक चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विद्यार्थ्याने विधी महाविद्यालयातील प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज दिल्यानंतर महाविद्यालयाने नेमकी कारवाई केली, याची माहिती पोलिसांकडून घेतील जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune Crime)





