पुण्यात ‘सिनेमास ऑफ इंडिया’ फेस्टिव्हल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ‘सिनेमास ऑफ इंडिया–अ फेस्टिव्हल ऑफ कंटेम्पररी इंडियन फिल्म्स’ चित्रपट महोत्सव होणार असून विविध भारतीय भाषांमधील १२ पुरस्कार विजेते चित्रपट यामध्ये दाखविण्यात येणार आहेत.
पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) येथे हा महोत्सव होणार आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स- इंडिया चॅप्टर (एफआयपीआरईएससीआय -इंडिया), आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी -एनएफएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रपट हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, तमिळ, मणिपुरी-तंगखुल, राजस्थानी-हिंदी आणि खासी-जैंतिया-गारो-हिंदी या भाषांमध्ये आहेत. एफआयपीआरईएससीआय -इंडियाचे सरचिटणीस पेमेंद्र मजुंबर आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (चित्रपट) प्रितुल कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.





