Jejuri News : दुर्दैवी घटना..! जेजुरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Jejuri News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दवणेमळा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Jejuri News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दवणेमळा परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरातून अचानक बेपत्ता झालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jejuri News)
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला सकाळच्या सुमारास घरातून अचानक दिसेनासा झाला. कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. शोधमोहीमेदरम्यान घराजवळील सेफ्टी टँकमध्ये तो आढळून आला. (Jejuri News)
चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर जेजुरी परिसरात शोककळा पसरली आहे. (Jejuri News)
प्राथमिक माहितीनुसार, मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे हरसगुडी, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) येथील असून, सध्या जेजुरी परिसरात वास्तव्यास होते. या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत. (Jejuri News)
दरम्यान, पावसाळ्यात घराच्या परिसरातील सेफ्टी टँक, विहिरी, पाण्याचे खड्डे आणि इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षितरीत्या झाकून ठेवणे, तसेच लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा साध्या पण महत्त्वाच्या खबरदारीमुळे अनेक दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात. (Jejuri News)






