Pune : गावठी दारूच्या भट्ट्या जेसीबीने उद्ध्वस्त; लोणी काळभोर परिसरात कारवाई

पुणे – गुन्हे शाखा आणि लोणीकाळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) संयुक्त कारवाई करत रामदरा कॅनल रोड लोणीकाळभोर परिसरात गावठी दारु तयार कणार्या भट्ट्यावर ( Gavthi liquor kilns) कारवाई केली. शुक्रवारी (दि.9) सकाळी सात वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या साह्याने गावठी दारु तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
Pune : गावठी दारूच्या भट्ट्या जेसीबीने उद्ध्वस्त; लोणी काळभोर परिसरात कारवाई pic.twitter.com/Y2rPHJtRF2
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 9, 2024
यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
पोलिसा आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरात स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.





