पुणे : ‘इग्नू’तर्फे प्रवेशासाठी मुदतवाढ
Updated On:

पुणे – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (इग्नू)पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अद्यापही काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत होती.
“इग्नू’तर्फे ट्विटरवर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर्षी यापूर्वीही अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरीही पदविका आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद झाले आहेत.





