Pune: पर्वती विकासापासून उपेक्षितच : अश्विनी कदम

पुणे – सातत्याने गेली १५ वर्षे सत्तेत असतानाही पर्वती विधानसभा मतदारसंघ विकासापासून उपेक्षित असल्याची टीका करत विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी या मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच, असा दृढ आत्मविश्वास महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केला. कदम यांनी लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाच्या परिसरात पुणे सातारा रोड मित्रमंडळ परिसरात घरोघरी भेट देत प्रचार केला. या वेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
याप्रसंगी नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. परिसरातील महिला, युवती, तरुण, ज्येष्ठ सर्वांनी त्यांचे औक्षण करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. गणेश मित्रमंडळ, हमराज मित्रमंडळ, सुवर्णयुग मित्रमंडळ, (गोलघर), बालवीर मित्रमंडळ, मानमोड्या म्हसोबा मित्रमंडळ, रामनवमी समिती, अभिनव मित्रमंडळ, क्रांती तरुण मंडळ, विजय बजरंग मित्रमंडळ, साईनाथ मित्रमंडळ, मानमोड्या मित्रमंडळ, सुवर्णभारत मित्रमंडळ, निराकार मित्रमंडळ, हनुमान मित्रमंडळ, गौरव घोडे मठ, न्यू दत्त मित्रमंडळ, शिवराज मित्रमंडळ, सदाबहार मित्रमंडळ, साई सेवा प्रतिष्ठान, नेहरू बाल विकास मित्रमंडळ, आझाद मित्रमंडळ, पंचशील चौक परिसरातील नागरिकांशी कदम यांनी संवाद साधला.
“मतदारसंघात मागील १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, मतदारसंघातील अनेक प्रश्न कायम असल्याने पर्वती विकासापासून वंचित आहे. त्यामुळे पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार मलाच साथ देतील.” – अश्विनी कदम (राष्ट्रवादी, महाविकास आघाडी उमेदवार)





