Pune : चंदन चोर ‘पुष्पा’चा अटकपूर्व फेटाळला तर पत्नीला संरक्षण

पुणे – एनडी.ए खडकवासला येथील अति-संरक्षित क्षेत्रात घुसून चंदनाच्या झाडाची चोरी केल्याप्रकरणी पुष्पाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर फौजदारी कलम 41 (अ) 1 नुसार नोटीस बजावलेल्या त्याच्या पत्नीला दिलासा मिळाला आहे. तिला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दोन्ही आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
रमेश करडे याचा अटकपूर्व फेटाळला. तर पत्नी पत्नी उषा हिला देण्यात आला. तिने अॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. अॅड. सोनार यांना अॅड. सुदर्शन खाडे, अॅड. वैभवी वंडकर आणि अॅड. महेश देशमुख यांनी सहाय्य केले. ती सहआरोपी आहे. तिच्याकडून वजनाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्यामध्ये तिचा कोणताही रोल नाही. तिला अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद अॅड. राकेश सोनार यांनी केला. 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेबाबत भगवान दारवटकर यांनी उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
रात्री 10 सकाळी 7 या दरम्यान घडलेल्या घटनेत 85 किलो चंदनाच्या लाकडाची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. रमेश याने केलेला अर्ज मात्र फेटाळण्यात आला.





