Pune : पुणे विद्यापीठ मुख्य इमारतीची वारसा सहल शनिवारी
Updated On:

पुणे, दि. २३ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारत, ऐतिहासिक संग्रहालय व परिसराची वारसा सहल शनिवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता इतिहास विभागातर्फे आयोजित करण्यात आली आहे.
ही सहल द. वा. पोतदार संकुल येथून सुरू होईल आणि मुख्य इमारत येथे दुपारी बारा वाजता संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत गट करुन मार्गदर्शकांसोबत ही सहल नेली जाईल.
यासाठी कोणतेही शुल्क नसून, सर्व नागरिकांसाठी ही सहल खुली आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या इतिहास विभागाने केले आहे.




