Pune : आपत्तीग्रस्तांना सिंहगड रस्त्यावरील सेवेकरी मंडळाची मदत

पुणे : सिंहगड रस्ता येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाच्या पुढाकारातून करंजी (ता. पाथर्डी) येथील आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महाराष्ट्रातील बांधव संकटात सापडले असताना कर्तव्य म्हणून ही मदत करण्यात आली. या उपक्रमासाठी सिंहगड रस्त्यावरील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त भागात जाऊन मदत वाटप केल्याने तेथील परिस्थितीची जाण झाली असून लवकरच मदतीची दुसरी फेरी नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मदतीत एका महिन्यासाठी पुरेल एवढा धान्यसाठा, जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश होता. या उपक्रमात समीर जागडे, मंगेश बुजवे, संजय वाघमारे, विक्रांत ढवळे, राज वाघमारे, सचिन पोतदार, अमोल राणे, सचिन शिंदे, बाळु गवळी, अक्षय घोडके, अजिंक्य घोडके, प्रथमेश बधे, ओंकार गवळी, सुरेश गालफाडे, दत्ता घोरपडे, संतोष तोंडे, अजय वाघमारे, कौस्तुभ ताम्हणकर, सौरभ मंडावले आदींनी विशेष मेहनत घेतली.





