Pune : शहरात गारवा वाढला, ढगाळ वातावरण
Updated On:

पुणे- शहर परिसरात पावसाची ओढ कायम असताना, तापमान कमी होऊन हवेतील गारवा वाढला आहे. आगामी तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते किरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगड भागांत हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्हीच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, पुण्यात मात्र अद्यापही पावसाची ओढ कायम आहे.





