Pune : सब भूमी गोपाल की..! आरोग्यमंत्र्यांनी घेतला मेट्रोचा आढावा…

पुणे : शहरातील विकासकामांवरून दोन दादांमध्ये शितयुध्द सुरू असतानाच आता त्यात,राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भर पडली आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी चक्क आरोग्य विभागाचे बैठक न घेता मेट्रो पार्किंग आणि शंकर महाराज मठ येथील अतिक्रमणासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाची बैठक घेत या समस्यांवर तातडीनं सूचना करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, सावंत यांचे कात्रज येथे घर असून शहरातील वेगवेगळया प्रश्नांबाबत महापालिकेस वारंवार सूचनाही केलेल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना बैठक घेण्याचा अधिकार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आता दोन्ही दादां पाठोपाठ आणखी एक मंत्री शहराच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरल्याने राजकीत वर्तूळातही हा विषय चर्चेचा ठरला आहे.
मेट्रोसाठी पार्किंगची व्यवस्था करा..
या बैठकीत मेट्रो प्रकल्प करण्यात आला मात्र याठिकाणी कोणत्याच मेट्रो स्थानकाला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना वाहनतळ आवश्यक आहे. यासाठी सावंत यांनी महापालिका आयुक्तांना काही सुचना केल्या. नदीपात्रामध्ये पुररेषेच्यावर वाहनतळ करता येवू शकतात. त्यामुळे यादृष्टीने पहाणी करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यातआल्या आहेत.
धनकवडी भागातील शंकर महाराज मठ याठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याचबरोबर संस्थेला मोठे प्रवेशव्दार करावयाचे आहे. यासाठी काही अडचणी आहेत. त्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी सावंत यांनी बैठकीत केली.





