Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला आरक्षण सोडत
Gram Panchayat Election : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या तब्बल ७५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Gram Panchayat Election : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या तब्बल ७५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १२ जून २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. (Gram Panchayat Election)
याच दिवशी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण प्रक्रियेनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचाली आणि मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे. (Gram Panchayat Election)
७५४ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांचे राज्य
जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे सध्या या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित राहिल्याने ग्रामपंचायत निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (Gram Panchayat Election)
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यंदाही सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (Gram Panchayat Election)
वॉर्ड रचना अंतिम, आता आरक्षणाकडे लक्ष
ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या वॉर्डनिहाय सदस्य आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणत्या गटासाठी कोणती जागा राखीव राहणार हे स्पष्ट होणार असून निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. (Gram Panchayat Election)
आरक्षण सोडतीचे वेळापत्रक
- १२ जून २०२६ – आरक्षण सोडत
- १९ जून २०२६ – प्रारूप आरक्षण प्रसिद्ध
- १९ ते २५ जून २०२६ – हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी
- ३ जुलै २०२६ – प्राप्त हरकतींवर सुनावणी
- १० जुलै २०२६ – अंतिम आरक्षण प्रसिद्ध





