पुणे : पठारे यांना एक लाखाचे मताधिक्य द्या : रोहित पवार यांचे आवाहन

* गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू ,विकासाचे सर्व प्रश्न हाताळू :रोहित पवार
* लोहगाव मध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रेचे तूफान
* वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडणार :आमदार रोहित पवार
विश्रांतवाडी : उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील. वडगावशेरी मतदारसंघात नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा संपन्न झाली. आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.
वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.०९) आमदार रोहित पवार यांच्या तुफानी प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले. यावेळी वडगावशेरीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व लोहगावकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले की, ‘काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता. तो भाजपने थांबवला. येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरातमध्ये हलवल्या. त्यामुळे इथल्या होतकरू तरुणाईवर अन्याय झाला.१५ लाख युवा दरवर्षी नोकरी,रोजगार शोधत फिरत असतो.हे पाहून शांत बसू नका,लढायला हवे.बुथवर लक्ष द्या.आपले सरकार येत आहे,६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मलिदा खाऊन पुतळा पडणार असेल, तर हे पाप कोणाचे ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
‘फडणवीस हे सर्वात खोटे बोलणारे नेते आहेत.ते महाराष्ट्र्राला फसवत आहेत.ते अभिमन्यू नाहीत,तर जनरल डायर आहेत. ते तरुणांना,महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. चक्रव्यूहातून सोडवू शकले नाहीत. या चक्रव्यूहातून फक्त शरद पवार हेच सोडवू शकतात.सामान्य जनता हीच त्यांची ऊर्जा आहे.
महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ते लढत आहेत. १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. गुजरातशाही इथे येऊ देणार नाही. सभेची वीज घालविणाऱ्याची वीज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घालवू . विरोधकांचे आम्ही बारा वाजवू.’असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.
‘रामकृष्ण हरी,वाजवू तुतारी ‘,’शरद पवार साहेबआगे बढो’.’महाविकास आघाडी आगे बढो ‘ अशा घोषणा त्यांनी उपस्थित समुदायाला द्यायला लावल्या,त्याला अर्थातच प्रचंड प्रतिसाद मिळाला.





