मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकात दाखल ; ‘गणपती बाप्पा मोरया…’ चा जयघोष
Updated On:

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान, पुण्यात मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकारत आहे. ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक आता थोड्याच वेळात अलका चौकामध्ये दाखल झाला आहे. चौकात भव्य अशी रांगोळी काढली गेली आहे.
राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.





