पुण्यात मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती बेलबाग चौकात दाखल

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान , पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, कसबा गणपती बेलबाग चौकात दाखल झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पालखीला खांदा देण्यात आला.
कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत रमणबाग परशुराम गर्जना ही पथके आणि प्रभात बँड, नगारा वादन करण्यात आला. त्यासोबतच मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे रथ, फलक झळकल्याचे पाहायाला मिळाले. अशा थाटामाटात आनंद पर्वाच्या उत्सवाच्या सांगतेला सुरुवात झाली.





