पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलगाम चौकात दाखल ; ताल वाद्य पथकाकडून वादन

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान, पुण्यात मनाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीनंतर आता दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. त्यात बेलबाग चौकात विसर्जन मिरवणूक आल्यानंतर ताल वाद्य पथकाकडून तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर वादन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून वादन करण्यात आले. हत्तीची प्रतिकृती आणि त्यावर छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड. या बँडचे वंदन ऐकण्यासाठी सर्वांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यासोबतच बाप्पाच्या निवणुकीत गंधर्व बँडने देखील गणरायाच्या गाण्याची धून वजानवून सर्वांना मंत्रमुग्ध केल्याचे दिसून येत आहे.





