गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…! पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती सुरु

Pune Ganpati Visarjan 2025। आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पांची उत्तरपूजा पार पडली. पूजा, आरती आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती सुरु झाली.थोड्या वेळात विसर्जनात मार्गस्थ होईल. त्यापूर्वी रंगोली काढण्यात येत आहे. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड असते. सभा मंडपातून कसबा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान
चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान होत आहे आणि मंडई कडे मार्गस्थ होईल
पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.





