प्रिय पत्र, पोस्टमन अन् पोस्टऑफिस आभार, माफी आणि निरोप… ; पुण्यात स्वराज्य ढोल पथकाचा अनोखा प्रयोग

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. पुण्याच्या मिरवणूक ह्या नेहमीच खास आकर्षण असते. यंदा देखील मिरवणुकीत स्वराज्य ढोल पथकाचा अनोखा प्रयोग केला आहे.
पुण्याच्या स्वराज्य ढोल पथकाचा अनोखा प्रयोग करत काळाच्या मागे पडत चाललेल्या पोस्ट ऑफिसची आठवण करून दिली आहे. स्वराज्य ढोल पथकाने यंदा खास पोस्टमनची वेशभूषा करत मानाचा पाचवा गणपती केसरीवाडाला ढोल वादन केले.
स्वराज्य ढोल ताशा पथकात २०० मुले पोस्टमनच्या वेशभूषा करून पथकात सहभागी झाले आहेत. हे पथक मूळचे पिंपरी चिंचवडचे आहे. दरम्यान, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुण्याच्या पोस्ट ऑफिसकडून पथकाला लोगो आणि वेशभूषेची मदत झाली असल्याचे पथकाकडून माहिती देण्यात आली.
दरम्यान, सोशल मीडियाचा दुनियेत पोस्ट हरवत चालले आहे त्यामुळे कुठे तरी पोस्टमन आणि त्यांच्या कार्याला ट्रिब्यूट देण्यासाठी ही संकल्पना सुचली असल्याचे स्वराज्य पथकाकडून सांगण्यात आले आहे,





