मानाच्या पहिल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत दिव्यांग मुलांच्या पथकाचं वादन
Updated On:

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान , पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, कसबा गणपती बेलबाग चौकात दाखल झाला आहे. दरम्यान, कसबा गणपतीच्या मिरवणुकीत यंदा दिव्यांग मुलांच्या पथकाचे वादन पाहायला मिळाले.
पुण्यातील गोखले नगरच्या दिव्यांग मुलांच्या कामायनी पथकाने गणरायाला वंदन केल्याचे दिसून आले. यामध्ये या मुलांनी ताशा आणि झांज वादन केल्याचे दिसून येत आहे. तसेच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.





