पुण्याच्या रस्त्यांवर बाप्पाच्या गाण्यांची धून ; अप्रतिम वादनाने परिसर मंत्रमुग्ध

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. पहिल्या मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड. या बँडचे वंदन ऐकण्यासाठी सर्वांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यासोबतच बाप्पाच्या निवणुकीत गंधर्व बँडने देखील गणरायाच्या गाण्याची धून वजानवून सर्वांना मंत्रमुग्ध केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान , कसबा गणपतीच्या मिरवणुकीत यंदा दिव्यांग मुलांच्या पथकाचे वादन पाहायला मिळाले. पुण्यातील गोखले नगरच्या दिव्यांग मुलांच्या कामायनी पथकाने गणरायाला वंदन केल्याचे दिसून आले. यामध्ये या मुलांनी ताशा आणि झांज वादन केल्याचे दिसून येत आहे. तसेच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.





