मानाचा पहिला कसबा गणपतीचे 3 वाजून 46 मिनिटांनी विसर्जन
Updated On:

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान , कसबा गणपतीचे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. पुण्याचा मानाचा पहिला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे 3 वाजून 46 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पतंगा घाटावर गणपतिचे विसर्जन झाले.





