पुण्यात सकाळी ९ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात ; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान , पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला यंदा ९ वाजता सुरुवात होणार आहे.त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती सुरु झाली.थोड्या वेळात विसर्जनात मार्गस्थ होईल. त्यापूर्वी रंगोली काढण्यात येत आहे. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड असते. सभा मंडपातून कसबा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
तर दुसरा मनाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरवात होणार असुन ढोल-ताशांचा दणदणाट, तर महिलांच्या ओव्या, भजनी मंडळींचा गजर आणि नऊवारी साडीतुन महिलांचे पथक प्रमुख आकर्षक रहाणार असुन बाप्पाची मिरवणूक हि पारंपरिक दिंडी पद्धतीची मिरवणूक या गणपतीची खास परंपरा आहे.





