Pune : ‘मैत्रीचा गणपती’ म्हणजे सद्भावना आणि एकात्मतेचा उत्सव; छाजेड परिवाराकडून १८ वर्षांपासून उत्सव आयोजित

स्वारगेट – छाजेड परिवाराकडून मागील १८ वर्षांपासून ‘मैत्रीचा गणपती’ उत्सव आयोजित केला जात आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक एकता, सौहार्द आणि सर्व वर्गातील लोकांच्या एकत्रीकरणाचा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचे हेच मुख्य उद्दिष्ट होते.
आज प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे किंवा भेटणे कठीण होतं आहे. अशा वेळी गणेशोत्सव माणसांच्या भेटी गाठी घडवून आणण्याचे काम करतो. या भावनेतून सिद्धी ग्रुपने पुणे येथे ‘मैत्रीचा गणपती’ या संकल्पनेसह लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमंत्रित देण्यास सुरुवात केली.
टिळक रोड स्थित सिद्धी ग्रुपच्या कार्यालयात विविध वर्गातील लोक गणेश चतुर्थीच्या निमित्त एकत्र येतात. गणपतीची आरती करतात. त्यानंतर एकमेकांशी संवाद साधत तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारू शकता. हे एक ‘मैत्रीचा गणपती’ हे एक वेगळेपण आहे.
सिद्धी ग्रुपचे मनोज छाजेड, मुकेश छाजेड, डॉ. प्रीती छाजेड आणि पुढच्या पिढीतील सिद्धांत छाजेड, साक्षी छाजेड, नीरज कांकरिया हे सर्व मिळून याचे आयोजन करतात. येथे सर्व वर्गातील लोक एकत्र येतात. जुनी मैत्री बहरते तर काही नवीन नाती तयार होतात.
गणेशोत्सवाचे सामाजिक महत्त्व आजच्या आधुनिक काळातही कायम आहे. आणि ‘मैत्रीचा गणपती’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची अनुभूती देते. छाजेड परिवार सुंदर आणि भव्य योजना आखतो. ज्यामुळे कौटुंबिक नाती दृढ होतात आणि प्रेमाचे बंध अधिक घट्ट होतात.





