Pune: ‘मोक्का’मधील फरार आरोपी जेरबंद; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पुणे – बंडगार्डन पोलिसांनी मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले. त्याला 2021 मध्ये मोक्का लागला होता. या गुन्हयातून तो जामिनावर सुटला असता पुन्हा एक गुन्हा केला. तो मागील वर्षभरापासून फरार होता. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
अनिकेत किशोर खंदारे (23 , तडीवाला रोड ) असे अटक आरोपीचे नाव आहे. खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केल्यानंतर तो सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याचा ठाविंठकाणा कळला असता बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सहाय्यक फौजदार मोहन काळे, हवालदार सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अंमलदार ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने केली.





