पुणे – येत्या शुक्रवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही फळ-भाजीपाला विभाग, केळी विभाग, गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, स्थापत्य विभाग, भांडार शाखा, छपाई लेखनसामुग्री, भुईकाटा केंद्र, पेटोल पंप विभाग, फुल बाजार, पान बाजार, माती पाणी परीक्षण व अन्नभेसळ प्रतिबंधक प्रयोगशाळा, मोशी, मांजरी, उत्तमनर व खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत. तर मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला विभागाला शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे येथील विभागाला सलग दोन दिवस सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, तसेच खरेदीरांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे