Pune : मॉडर्न विकासतर्फे ५७ रूग्णांवर मोफत उपचार

पुणे – चक्कर येणे, गुदमरून दम लागणे आणि जखम झालेले असे एकूण ५७ रूग्णांना लक्ष्मी रस्त्यावरील मॉडर्न विकास मंडळ, पुणे आणि स्मार्ट पुणे फाऊंडेशन या संयुक्तविद्यमाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरू केलेल्या मोफत वैद्यकीय केंद्रात देण्यात आली. यावेळी दोन रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज चौकात डॉ. संदीप बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली सलग २० व्या वर्षी हे वैद्यकीय केंद्र सुरू होते. या केंद्राचे उद्घाटन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, प्रशांत हरसुले, दिलीप उंबरकर, अनिल बेलकर, दादा खत्री, प्रमोद कोंढरे, मनिषा बुटाला उपस्थित होते.
या मोफत वैद्यकीय सेवेत चक्कर येऊन पडणे, डी हायड्रेशन, हाताला-पायाला जखम, गुदमरुन दम लागणे, रक्तदाब कमी होणे, गुलालाच्या अॅलर्जीमुळे अॅक्युट दमाच्या रुग्णांची ऑक्सीजन लेवल कमी होणे अशा प्रकारच्या रुग्णांना डॉ. संदीप बुटाला यांच्यासह डॉ. प्रियांक जावळे, डॉ. तुषार जगताप, डॉ. प्रसाद आंबीकर.
डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. राजेंद्र खेडेकरे, डॉ. मनिषा जाधव, डॉ. चिल्ले यांनी सेवा दिली. नानासाहेब ओव्हाळ, बळीराम भडकवाड, योगेश मराठे, सुयश बुटाला, शत्रुघ्न ओझरकर, भरत मराठे, विलास मोहोळ, मनिष कदम, रामभाऊ भगत, पांडुरंग शिंदे, आकाश मालपोटे, स्वप्निल खामकर यांनी विशेष योगदान दिले.





