पुणे – सासवडमध्ये ‘युनिक मेडिकल फाऊंडेशनच्या’ वतीने वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार…

पुणे – ‘युनिक मेडिकल फाऊंडेशनच्या’ वतीने सोमवारी जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला दिंडी क्र २४, गोखलेनगर येथील विठ्ठल सेवा मंडळ खेड बुद्रुक दिंडी क्र १००, कर्वेनगर येथील महालक्ष्मी मंदिर दिंडी क्र २८०, व दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व बुधवारी सासवड येथील संत सोपान काका समाधी मार्गावरील जगताप बंधू यांच्या येथे पंढरीच्या वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
युनिक मेडिकल फाऊंडेशन गेली १७ वर्षे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे व सासवड येथे मोफत औषधोपचार करीत असून यंदाही त्यांनी ही सेवा कार्यरत ठेवली. या वर्षी १,७०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ. राहुल लोखंडे, खजीनदार मानसी लोखंडे, सचिव नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ दिनेश हेडगिरे, डॉ. गणेश खाडे, डॉ प्रतिक मेमाने, डॉ माधवी लोखंडे यांच्यासह वैशाली खंडागळे, पद्मा रमपुरे, वासंती कोयाळीकर, अक्षय नागरगोजे, केदार गोंजारी, प्रशांत लोखंडे, संतोष परब, अण्णा भांडवलकर, संण्डे क्लब तर्फे सुनील भांडवलकर आणि त्यांची टीम, जयवंत कुंभार यांचे आयुष फार्मा, विरपत्नी योगिता गिरीगोसावी यांचे कुणाल मेडिकल यांनी देखील सहकार्य केले.





