PUNE: माजी आमदार विनायक मेटे यांची सदनिका बळकावली
Updated On:

पुणे – स्व. माजी आमदार विनायक मेटे यांची विमाननगर येथील सदनिका सख्खी बहीण आणि तिच्या मुलाने बळकावल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी मेटे यांचा मुलगा आशुतोष विनायक मेटे (२०, रा. कोरेगाव पार्क) याने तक्रार दिली आहे.
त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, मेटे यांची बहीण आणि भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील गंगापूर हौसिंग सोसायटीमध्ये विनायक मेटे यांची सदनिका होती. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ठाणे येथील बहिणीने आणि भाच्याने लॅच लॉक तोडून सदनिकेचा ताबा घेतला. ही सदनिका मेटे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा शिक्षणानिमित्त कोरेगाव पार्क येथे राहातो. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे करत आहेत.
टॅग्स:





