PUNE : गणेश मंडळ मंडपाच्या छताला आग; जे.पी. नड्डा यांच्यासमोर साने गुरूजीनगर येथे घटना
Updated On:

पुणे – आंबील ओढा कॉलनीतील साने गुरुजीनगर येथे गणपती मंडळाने सजावट केलेल्या मंडपाच्या छताला मंगळवारी आग लागली. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भेट देण्यासाठी आले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून परिस्थिी नियंत्रणात आणली. नड्डा यांना तेथून सुखरुप बाहेर काढत नियोजनाप्रमाणे कोथरुड येथील एक मंडळाच्या आरतीसाठी नेण्यात आले.
अग्निशमन दलाकडून दोन फायर गाड्या व एक वॉटर टॅंकरच्या मदतीने आग नियंत्रणात आली. मात्र, मंडळाला भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच प्रचंड वाहतूक कोंडीला अग्निशमन दलाच्या बंबांनाही तोंड द्यावे लागले. दरम्यान, दिल्लीतील राजकीय पाहुण्यांनी आग पाहताच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.





