पुणे जिल्हा : वाघोलीत भीषण अपघात ; तीन मृत्युमुखी तर सहा गंभीर जखमी

वाघोली पोलीस स्टेशन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे पहाटे च्या सुमारास दारूच्या नशेत डंपर चालकाने पोलीस चौकी समोरील मोकळ्या जागेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले यात तीन जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी असून वाघोली पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला अटक करून सदोष मनुष्यवदाचा गुन्हा पहाटे दाखल केला आहे.
याबाबतीत वीरेंद्र परमदासजी भोसले वय 45 वर्ष धंदा मजुरी सध्या केसनंद फाटा फिरस्ता मूळ राहणार सारवाडी देववाडी तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा यांनी वाघोली पोलीस ठाण्यात दिली असून गजानन शंकर तोटरे, वय 26 वर्ष सध्या राहणार- तानाजी हरगुडे यांचे खोलीत, केसनंद ता.हवेली मूळ राहणार पाळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23/12/ 2024 चे 01/00 वा. चे सुमारास मौजे वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे गावचे हद्दीत केसनंद फाटा चौकातील फुटपाथ लगत गायरान जागेमध्ये यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक मौजे वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे गावचे हद्दीत वाघोली पोलीस स्टेशनचे समोरील मोकळ्या गायरान जागेमध्ये फुटपातलगत केसनंद फाटा वाघोली येथे झोपेत असताना पुण्याकडून केसनंद कडे जाणारा हायवा डंपर MH 12/VF/0437 यावरील वर नमूद चालक याने दारूच्या नशेत डंपर चालविल्यास मनुष्यास जीवित हानी होऊ शकते हे माहीत असताना दारूच्या नशेत त्याचे ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवून डिव्हायडर वर चढवून अपघात केला आहे.
मृत्यांची नवे
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्षे
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्षे
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्षे
जखमींची नवे
वरील प्रमाणे 3 मयत व
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार, 18 वर्षे
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18 वर्षे
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे हे 6 जण जखमी आहेत. जखमींवर ससून हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत





