Pune : अभियांत्रिकी केवळ यंत्रांची नव्हे जीवनातील समस्या सोडवण्याची कला – अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी

पुणे : अभियांत्रिकी केवळ यंत्रांची नव्हे, तर जीवनातील समस्या सोडवण्याची कला आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या निरोप समारंभप्रसंगी प्रा. जोशी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, मूल्यांशी एकनिष्ठ राहून जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थिनींना समाजाभिमुख विचार करण्याचा आणि मानवी गरजांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, विद्यार्थिनींनी सतत नाविन्याचा ध्यास घेऊन शिकत राहायला हवे. तसेच, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उत्तम अभियंता बनावे. याप्रसंगी विद्यार्थिनींनी नृत्य, गायन, अभिनय आणि कविता वाचन केले.





