Pune : गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना

पुणे – दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राज्यातील गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदत योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत सर्व कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज याच काळात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात विनामूल्य मिळतील व याच वेळेत स्वीकारले जातील.
पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरातील अर्ज समक्ष येऊन दाखल करावयाचे आहेत. इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरातील अर्ज संस्थेच्या नावे लिहून स्पीड पोस्टाने सर्व कागदपत्रांसहित पाठवावेत. अर्जासोबत दोन फोटो, गुणपत्रिका, रेशनकार्ड, वीजबिल, अल्पभूधारक असल्यास सातबारा, ८ अ उतारा प्रत आवश्यक आणि नसल्यास भूमिहीन दाखला आवश्यक आहे.
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सरोज भवन, विद्यार्थिनी वसतिगृह, बालाजी पार्क लेन नंबर ३, केसनंद रोड, शाहू बॅंकेजवळ, वाघोली, पुणे – ४१२२०७ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत, असे आवाहन दिशा परिवारातर्फे करण्यात आले आहे
कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंगमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि बारावीमध्ये ८० टक्के गुण असणारे विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र राहतील. दहावीनंतरच्या डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या मदतीमध्ये महाविद्यालयाची फी, राहणे, जेवण यांसाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल. गरजू विद्यार्थ्यांचे पालक शेतमजूर, अल्पभूधारक, अल्प उत्पन्नधारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा मदतीसाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
दरम्यान, या शैक्षणिक मदत योजनेच्या माहितीसाठी संपर्क व मोबाइल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
९६२३०८८०९९, ९१५८३८३८५२, ७७४१९७३२०४, ९४२३४९२२३३, ९४२२३०७१४६.
ईमेल आयडी : [email protected]





