‘सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी #serious व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री साहेब…’

Pune Drugs Case । शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे.
या प्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा सध्या होत आहे. ‘मी पालकमंत्री होतो, “मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत’ असं विधान त्यांनी केलं. अशात आता यावरून अजित पवार गटाच्या नेत्यांकडून पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेले कोल्ड वार कायम आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे.
‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या @ChDadaPatil दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या… https://t.co/rv6u0nAgwZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 24, 2024
Pune Drugs Case । नेमकं काय म्हणाले रोहित पवार…
‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील (दादांनी ) हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या #कॅथा_इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे #उडते_पुणे झाले आहे. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
रोहित पवार यांनी पुढे नमूद केले आहे की,’पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे #गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती. #सुपरफास्ट_देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी #serious व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा.. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही.’ असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा टीका केली आहे.





