मध्यरात्री तीनच्या सुमारास दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली, ‘एलएनजेपी’ रुग्णालयात दाखल

Delhi Water Crisis। दिल्लीतील पाणीटंचाईवर बेमुदत उपोषणाला बसलेल्या जलमंत्री अतिशी यांची रात्री तीनच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात (एलएनजेपी) दाखल करण्यात आले. त्यांची शुगर लेव्हल बरीच कमी झाली होती. यानंतर त्वरित त्यांना दाखल करण्यात आले. आतिशी सिंग सध्या डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत.
जलमंत्री आतिशी हे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषणावर असून हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आतिशी सिंह यांची प्रकृती खालावल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, सौरभ भारद्वाज, आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे आणि गोपाल राय हे देखील त्यांना पाहण्यासाठी आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी एलएनजीपीएस रुग्णालयात दाखल झाले आहे.
🚨 Water Minister Atishi’s health deteriorates 🚨
Her blood sugar level dropped to 43 at midnight and to 36 at 3 AM, after which LNJP Hospital doctors advised immediate hospitalization. She has not eaten anything for the last five days and is on an indefinite hunger strike… pic.twitter.com/nl5iTfnwnT
— AAP (@AamAadmiParty) June 24, 2024
Delhi Water Crisis । रक्तातील साखर 36 पर्यंत घसरली
आम आदमी पार्टीने ट्विट केले की,’त्यांची रक्तातील साखरेची पातळी मध्यरात्री 43 आणि पहाटे 3 वाजता 36 पर्यंत घसरली, त्यानंतर एलएनजेपी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना तातडीने दाखल करण्याचा सल्ला दिला. गेल्या पाच दिवसांपासून त्या काहीही खात नाही आणि हरियाणाकडून दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी त्या बेमुदत उपोषणावर आहे.’
Delhi Water Crisis । सकाळी ८ वाजता हेल्थ बुलेटिन जारी केले जाईल
LNJP रुग्णालयाचे डॉक्टर सकाळी 8 वाजता आतिशी सिंह यांचे हेल्थ बुलेटिन जारी करतील.
Delhi Water Crisis । आतिशी यांनी सोमवारी सांगितले होते की, ‘त्यांच्या अनिश्चित उपोषणाचा हा चौथा दिवस आहे. दिल्लीत पाण्याची मोठी टंचाई आहे. हरियाणाने पाणीपुरवठा कमी केला आहे. माझे बीपी आणि शुगर कमी होत आहे. माझे वजनही कमी होत आहे. दिल्लीला पाणी मिळे पर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे आतिशी सांगतात.’
Delhi Water Crisis । टीएमसीने आतिशीला पाठिंबा दिला
चौथ्या दिवशी टीएमसी खासदारांचे शिष्टमंडळ जलमंत्री आतिशी यांच्या समर्थनार्थ पोहोचले आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सर्व खासदारांनी आतिशीजींच्या संघर्षाचे कौतुक केले आणि संसदेत दिल्लीशी एकजुटीने आवाज उठवण्याचे वचन दिले.





