Pune District : लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार
Updated On:

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार करण्यात आला.
अजय कैलास साळुंखे (रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर), याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित युवतीची ओळख अजय साळुंखे याच्यासोबत झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र, युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले.
त्यांनतर पीडित युवतीने त्याच्याशी भांडण करीत पोलिसांत तक्रार देते, असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावून युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा युवतीला कोरेगाव भीमा येथील मित्राच्या रूमवर घेऊन जाऊन युवतीवर बलात्कार केला. याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली. पुढील महिला तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करीत आहेत.





