Pune District : हिवरे येथे नारीशक्तीचा सन्मान

सासवड : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरंदर तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात करण्यात आला.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा आदर्श महिला पुरस्कार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व माळशिरसच्या माजी उपसरपंच शाहजान शेख यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालींदर कामठे, भानूकाका जगताप, एम. के. गायकवाड, संदीप देवकर, सचिन पठारे, पुनम कामठे, रामदास कुदळे, शब्बीर शेख, नंदू गायकवाड, राजाराम कुदळे, वामन गायकवाड, अशोक दळवी, दीपक गायकवाड, शोभा दळवी, संतोष दळवी, रमेश कुदळे, भारती गायकवाड, अनिता कुदळे, सुनीता रायडू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भोसले यांनी तर दत्तात्रय गायकवाड यांनी आभार मानले.





