Pune District : सीटबेल्ट दंड वाचवण्यासाठी नाही, सुरक्षेसाठी लावा

पळसदेव : मार्च महिना सुरु झाल्याने सर्वच विभागात कामे उरकण्याची गडबड सुरु आहे. तर अनेक विभाग आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. याला वाहतूक पोलीसदेखील अपवाद नाहीत. त्यामुळे सध्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस उभा राहून बेशिस्त नागरिकांना दंड लावून आपलं टार्गेट पूर्ण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनो नियमात चला, अन्यथा आर्थिक भुर्दंड नक्कीक समजा.
नियमसे रहोगे तो फायदेमे रहोगे। या म्हणी प्रमाणे वाहतुकीचे नियम पाळा आणि निश्चिन्त प्रवास करा. सध्या बिना हेल्मेट 1 हजार, ओव्हर स्पीड दुचाकी 1 हजार, कार 2 हजार व मोठी वाहने 4 हजारपर्यंत दंड आकारजा जात आहे. यासोबत विमा, लायसन्स, पीयूसी नसल्यास वाहन चालकांना दंड आकाराला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठी चाट बसत आहे.
दररोज सुमारे 80 ते 100 नियम मोडणार्या वाहनांना डाळज येथे दंड आकारला जात आहे. यातून सरकारला मोठा महसूल जमा होत आहे. अनेकदा पोलीस दंड आकारतात म्हणून ओरड देखील होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाहकच आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी व स्वतःच्या सुरक्षितेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. अनेक अपघात अधिक वेगाने वाहने चालवण्याने होतात. वाहनाचा वेग मर्यादित राहिल्यास या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होऊन अनेकांचा जीव वाचेल. त्यामुळे नागरिकांनी दंड बसतो म्हणून नागरिक सीट बेल्ट लावतात. पोलीस गेले की काढून ठेवतात. नागरिक पोलीस पाहिल्यावर दंड बसू नये म्हणून गाडीचा वेग कमी करतात आणि पुढेच गेले की पुन्हा अधिक वेगाने गाड्या चालवतात; मात्र नागरिकांनी दंड वाचवण्यासाठी नाही तर स्वतःच्या सुरक्षितेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत.
-संतोष काळे, वाहतूक पोलीस





