पुणे जिल्हा : बारामतीत लालपरीचे चाके थांबली

एसटीचे 450 कर्मचारी आंदोलनात सहभागी
बारामती – एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने मंगळवारी (दि. 3) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केल्यावर यामध्ये बारामती आगारातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले. एसटी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केल्यावर लालपरीची चाके थांबली.
बारामती आगारातील चालक, वाहक, क्लार्क व यांत्रिक कामगार असे जवळपास 450 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने मंगळवारी बारामती आगारातील सर्व बसेसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या. एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने एस. टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
या आहेत मागण्या
* राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे
* कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबर मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे
* महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे
* मागील करारातील त्रुटी दूर करणे
* शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल
* सर्व कर्मचार्यांना मेडिकल कॅशलेस योजना लागू करणे





